Join us  

एसटीचे भाडे १८% वाढणार, १५ जूनपासून अंमलबजावणी; विद्यार्थ्यांच्या सवलत पासलाही बसणार झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 5:22 AM

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या एसटीच्या प्रवास भाड्यात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केले असून, १५ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

- महेश चेमटेमुंबई : सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या एसटीच्या प्रवास भाड्यात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केले असून, १५ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया सवलतीच्या पासमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.एसटीमधील सुट्ट्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी तिकिटाची भाडेआकारणी पाचच्या पटीत होणार आहे. यानुसार दोन प्रवासी टप्प्यांवरील तिकिट दर ८ रुपये असल्यास १० रुपये आकारण्यात येईल. सातऐवजी पाच रुपये तिकिट आकारण्यात येईल. मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास तब्बल ८५ रुपयांनी महाग होईल. एसटीने प्रवास करणाºया सुमारे ७० लाख जनतेला या भाडेवाढीची झळ सोसावी लागणार आहे. वाढत्या इंधनदरामुळे नाइलाजास्तव ही दरवाढ करण्यात येत असल्याचे एस. टी. महामंडळाचे म्हणणे आहे.- डिझेलवरील कर माफ करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीचा फेरविचार करू, असे रावते म्हणाले.इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी साधारण ४६० कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. तिकिट दरात ३० टक्के वाढ प्रस्तावित होती. प्रत्यक्षात ती १८ टक्के इतका करण्याचा निर्णय घेतला आहे.- दिवाकर रावते, परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष

टॅग्स :राज्य परीवहन महामंडळदिवाकर रावते