Join us

एस.टी. बसला अपघात

By admin | Updated: August 26, 2014 01:19 IST

पनवेल - साई एस. टी. बसला मुंबई - गोवा रोडवर कर्नाळा खिंडीत अपघात झाला. या अपघातामध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे

नवी मुंबई : पनवेल - साई एस. टी. बसला मुंबई - गोवा रोडवर कर्नाळा खिंडीत अपघात झाला. या अपघातामध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. पनवेलवरून साई गावाकडे जाणारी बस ६ वाजण्याच्या सुमारास कर्नाळा खिंडीत आली असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. बस रोडच्या बाजूला नाल्यात गेली. बसमधील ४० प्रवाशांपैकी काहींना किरकोळ दुखापत झाली. काहींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांना इतर बसेसमधून पुढे पाठविण्यात आले.