मुंबई : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना 2क्14-15 या वर्षासाठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली.
नाटय़ क्षेत्रत प्रदीर्घ काम केलेल्या ज्येष्ठ रंगभूमी कलाकारास प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप रोख 5 लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. या पुरस्कारासंदर्भात निवड करण्यासाठी तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, सांस्कृतिक कार्य संचालक संजय पाटील यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे उपस्थित होते.
श्रीकांत मोघे यांनी ‘वा:यावरची वरात’, ‘तुङो आहे तुजपाशी’, ‘सीमेवरून परत जा’, ‘बिकट वाट वहिवाट’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘मृत्युंजय’, ‘शेर शिवाजी’ (हिंदी), ‘स्वामी’ अशा अनेक नाटकांत आपल्या दमदार आणि सशक्त अभिनयाने स्वत:ची छाप उमटवली. (प्रतिनिधी)
रंगभूमीचा वरदहस्तच -मोघे
नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणो हा जणू रंगभूमीचा वरदहस्तच आहे, या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी आनंद व्यक्त केला. रंगभूमीवर काम करण्याचा आनंद निराळाच असल्याचे सांगत रसिकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याची कृतज्ञता त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.