Join us

कर्नाटकात श्रीमाणिक सोहळा

By admin | Updated: February 21, 2017 03:49 IST

कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातील माणिक नगर येथील संस्थानतर्फे १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरया कालावधीत श्रीमाणिकप्रभू जन्मद्विशताब्दी

मुंबई : कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातील माणिक नगर येथील संस्थानतर्फे १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरया कालावधीत श्रीमाणिकप्रभू जन्मद्विशताब्दी सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थानचे सरचिटणीस आनंदराज माणिक प्रभू यांनी सोमवारी येथे दिली. १९ ते २९ नोव्हेंबर प्रभुमंदिराच्या सुवर्ण शिखरावर नित्य महाकुंभाभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर ४ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतील. माणिकनगर येथे श्रीमाणिक प्रभू यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांचा ‘सकलमत संप्रदाय’ देशविदेशात कार्यरत आहे. महाराष्ट्रातही त्यांचे मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. श्री स्वामी समर्थ, साईबाबा, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आदी समकालीन संतांच्याही ते संपर्कात होते. (प्रतिनिधी)