नवी मुंबई : शहराच्या अनेक भागांत मंगळवारी संध्याकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. थेंब थेंब पावसाबरोबरच जोरदार वारा सुटल्याने कामावरून घरी परतणाऱ्यांची एकच धांदल उडाली.रायगड जिल्ह्यात रोहा, माणगाव, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यांना मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. रोहा व परिसरात तर गारांचा पाउस झाला. तर वादळी वाऱ्याबरोबर पावसाच्या दमदार सरी पडल्याने रस्ते ओले चिंब झाल्याचे पाहावयास मिळाले. वादळवाऱ्यासह आलेल्या या पावसाने गारवा निर्माण झाला. पोलादपूरमध्ये एक झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)
नवी मुंबईत पावसाचा शिडकावा
By admin | Updated: May 6, 2015 00:41 IST