Join us  

जोडीदार हवा निर्व्यसनीच; नशाबंदी मंडळाचा उपक्रम, नरिमन पॉइंट येथे वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 4:00 AM

राज्याच्या नशाबंदी मंडळाने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने बुधवारी दुपारी नरिमन पॉइंट येथे आगळीवेगळी वरात काढली. ‘जोडीदार मज निर्व्यसनीच हवा’ या संदेशाचे पोस्टर हाती घेत तरुणींनी ढोल ताशांच्या तालावर घोड्यावर स्वार होत वरात काढुन व्यसनमुक्तीचा प्रचार केला.

मुंबई : राज्याच्या नशाबंदी मंडळाने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने बुधवारी दुपारी नरिमन पॉइंट येथे आगळीवेगळी वरात काढली. ‘जोडीदार मज निर्व्यसनीच हवा’ या संदेशाचे पोस्टर हाती घेत तरुणींनी ढोल ताशांच्या तालावर घोड्यावर स्वार होत वरात काढुन व्यसनमुक्तीचा प्रचार केला.व्यसनाधिनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने या दिलखुलास कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली. त्या म्हणाल्या की, व्यसनमुक्तीचा संदेश एकाच वेळी देण्याच्या उद्देशाने मुंबईसह संपूर्ण राज्यात ‘प्रेम करा, मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा’ हा संदेश देण्यात आला. त्यासाठी राज्यातील लेकी रस्त्यावर उतरल्या होत्या. व्यसनमुक्तीचा लढा यापुढे अखंडपणे चालू राहील. व्यसनमुक्त जीवनच सुखसमृद्ध बनवू शकते, म्हणून निर्व्यसनी आयुष्याची कास धरली पाहिजे, असे मतही वर्षा विद्या विलास यांनी व्यक्त केले.या वेळी नशाबंदी मंडळाने सामाजिक न्यायमंत्री, अभिनेते सिध्दार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, स्वप्निल जोशी, दिलीप प्रभावळकर, देवदत्त नागे, जयवंत भालेकर आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या प्रेमाच्या विचारांचे व्यसनमुक्तीपर प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले.सामुदायिक विवाह सोहळा : १८ जोडप्यांना व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधत विवाह बंधनात अडकविण्यात येणार आहे. अठरा अल्पसंख्याकसह इतर जाती धर्माच्या जोडप्यांचा सोहळा वेसावा कोळीवाड्याच्या बस स्टॉपच्या मागील बाजूस असलेल्या ग्राउंडवर सायंकाळी ७ ते १० या वेळात साजरा होणार आहे. प्रत्येक जोडप्याला दीड लाखांचे दागिने, बेडपासून ते गृहपयोगी वस्तू, भांडी, मिक्सर भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई