Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडपीडित तरुणीच्या सर्जरीचा खर्च करा

By admin | Updated: March 20, 2015 02:03 IST

गोरेगाव रेल्वे स्थानकावर अ‍ॅसिडहल्ला झालेल्या तरुणीच्या सर्जरीचा खर्च करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले़

हायकोर्टाचे आदेशमुंबई : गोरेगाव रेल्वे स्थानकावर अ‍ॅसिडहल्ला झालेल्या तरुणीच्या सर्जरीचा खर्च करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले़या तरुणीवर ३१ जानेवारी २०१२ रोजी अ‍ॅसिडहल्ला झाला़ नुकसानभरपाईसाठी या तरुणीने न्यायालयात याचिका केली असून, ३० लाख रुपयांची मागणी केली आहे़ अ‍ॅसिडहल्ल्यामुळे झालेल्या जखमांच्या सर्जरीचा खर्च शासनाने करावा, अशी विनंतीही तरुणीने याचिकेत केली आहे़ मात्र अ‍ॅसिडपीडित तरुणींना नुकसानभरपाई देण्यासाठी सुरू केलेली मनोधैर्य योजना २०१३मध्ये लागू करण्यात आली असून, या तरुणीवर २०१२मध्ये हल्ला झाला आहे़ ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही़ त्यामुळे या तरुणीला या योजनेंतर्गत पैसे देता येणार नसल्याचा दावा शासनाने केला़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते़ प्रतिज्ञापत्र सादर न झाल्याने खंडपीठाने वरील आदेश दिले़