मराठीतील अनेक कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांत सध्या खूप चांगले काम करत आहेत. नेहा पेंडसे, श्रुती मराठे, सयाजी शिंदे यांसारख्या कलाकारांनी तर दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपले एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सयाजी शिंदे यांनी तर दक्षिणेतील अनेक भाषांमध्ये काम केले असून, तेथील महत्त्वाच्या कलाकारांमध्ये त्यांची गणना केली जाते. आता स्पृहा जोशी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे. तिने स्वत: ट्विट करून ही बातमी तिच्या फॅन्सना दिली आहे आणि त्यासोबत एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. या फोटोतील तिचा लूक पाहता तिच्या दाक्षिणात्य चित्रपटातील हा लूक असावा असेच वाटत आहे. मराठी चित्रपटात आपली एक ओळख बनवल्यानंतर आता स्पृहा दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपले भाग्य आजमावणार आहे.
स्पृहा जोशी झळकणार दाक्षिणात्य सिनेमात
By admin | Updated: April 10, 2017 04:59 IST