Join us  

स्पेशलायझेशन इन डेटा सायन्स शिका मुंबईत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:32 AM

भारतातील डेटा सायन्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मान मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे.

मुंबई  - भारतातील डेटा सायन्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मान मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाचा संगणकशास्त्र विभाग सुरू होऊन ४० वर्षे होत आहेत आणि त्याच निमित्ताने विभागामध्ये सुरू असलेला एमएससी कॉम्प्यूटर सायन्स हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लेंडेड मूक या मॉडेलमध्ये देण्याची, तसेच जागतिक मागणीचे डेटा सायन्स या अभ्यासक्रमाचे स्पेशलायझेशन राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्याची घोषणा विद्यापीठाच्या अकॅडेमिक कौन्सिलमध्ये करण्यात आली.ब्लेंडेड मुकमधील डेटा सायन्सच्या पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर विद्यार्थी प्रवेश परीक्षा घेऊ शकतो. यासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०१८ आहे. बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रोग्राममधील मॉड्युल्सना प्रवेश घेऊन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अर्धे क्रेडिट्स जमवता येतील. राहिलेले क्रेडिट पदवीनंतर पूर्ण करून पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येईल. यासाठीची माहिती विद्यार्थ्यांना ँ३स्रस्र://४ूि२.े४.ंू.्रल्ल/, ँ३स्रस्र://६६६.ेंँंस्रं१्र‘२ँं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.विद्यार्थ्याला संगणकशास्त्र विषयातील उत्तम दर्जाची एमएससी स्वत:च्या सवडीनुसार विद्यापीठाच्या विभागातून अत्यंत कमी खर्चात उपलब्ध व्हावी, या हेतूने हे मॉडेल डिझाइन केले आहे. दररोज अपलोड केलेल्या व्हिडीओनुसार विद्यार्थी आपापल्या ठिकाणी अभ्यास करू शकणार आहेत. आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थाने त्यास नेमून दिलेल्या अभ्यासकेंद्रात प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक आहे. डेटा सायन्सचे उद्दिष्ट हे कोणत्याही क्षेत्रातील मनुष्याचा अनुभव हा संगणकावर एनकोड करून संगणकाधारे निर्णय प्रक्रिया राबविणे, हा असल्याने यात विद्यार्थ्यांना विज्ञान, समाजशास्त्र, संगीत अशा आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात संगणकाधारीत संशोधन आणि करिअर करता येणार येईल.विशेष सवलतडेटा सायन्सचा अभ्यासक्रम हा चौथ्या औद्योगिक क्रांतीला सामोरा जाणारा सुसज्ज महाराष्ट्र घडविण्यासाठी उपयुक्त असल्याने त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे.भारतात आणि जगभरात संगणकशास्त्र आणि डेटा सायन्स या विषयातील तज्ज्ञांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे डेटा सायन्सच्या प्रोग्रॅममध्ये ५० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्याना प्रोत्साहन म्हणून पुढील कोर्सेसच्या फी मध्ये १० ते ५० टक्केपर्यंत सवलत देणार आहे.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रमुंबई विद्यापीठ