Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - मंडुआडीह, पुणे - गुवाहाटी दरम्यान विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:05 IST

लोकमत न्युज नेटवर्कमुंबई : मुंबई / पुणे - मंडुआडीह आणि पुणे - गुवाहाटी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात ...

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : मुंबई / पुणे - मंडुआडीह आणि पुणे - गुवाहाटी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी असेल. प्रवाशांना प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानावेळी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे.

मुंबई - मंडुआडीह विशेष अतिजलद गाडी २० व २७ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून १२.१० वाजता सुटेल आणि मंडुवाडीह येथे दुसऱ्या दिवशी १५.०० वाजता पोहोचेल. मंडुवाडीह येथून विशेष गाडी २१ व २८ एप्रिलला १८.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी २१.४५ वाजता पोहोचेल. तर पुणे - मंडुवाडीह विशेष अतिजलद गाडी २० व २७ एप्रिलला पुणे येथून २०.२० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी मंडुवाडीह येथे ०३.३५ वाजता पोहोचेल.

याचप्रमाणे मंडुवाडीह येथून विशेष गाडी २२ व २९ एप्रिलला ०२.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.२० वाजता पोहोचेल. पुणे - गुवाहाटी विशेष एकमार्गी (वन वे) गाडी पुणे येथून २१ एप्रिलला ०६.१० वाजता सुटेल व गुवाहाटी येथे तिसऱ्या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल.