लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व संपूर्ण आरक्षित ग्रीष्मकालीन विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा व विशेष ट्रेनचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २८ एप्रिल रोजी १४.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी २३.२० वाजता पोहोचेल. विशेष गाडी गोरखपूर येथून ३० एप्रिल रोजी ४ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस २९ एप्रिल रोजी १४.३० वाजता सुटेल आणि भागलपूरला तिसऱ्या दिवशी २.१० वाजता पोहोचेल. विशेष गाडी भागलपूर येथून १ मे रोजी ०५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २५ एप्रिल रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी गोरखपूर येथून दि. २७ मे रोजी १७.४० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०५.२० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २८ मे रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०५.०५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी गोरखपूर येथून ३० मे रोजी सकाळी ९.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.
* गोरखपूर-पनवेल विशेषचा विस्तार
गोरखपूर-पनवेल विशेष २४ एप्रिल आणि २८ एप्रिल (२ फेऱ्या) रोजी सोडण्यात येतील. पनवेल-गोरखपूर विशेष २६ एप्रिल आणि ३० एप्रिल (२ फेऱ्या) रोजी सोडण्यात येतील. या विशेष ट्रेनच्या संरचनेत, थांबा व वेळेत कोणताही बदल होणार नाही.
....................