Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपीसाठी विशेष पथके

By admin | Updated: May 30, 2015 01:56 IST

धारावीतल्या चामडयाच्या कारखान्यात सातवीतल्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्यांपैकी फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

मुंबई :धारावीतल्या चामडयाच्या कारखान्यात सातवीतल्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्यांपैकी फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके शहराबाहेर रवाना झाल्याची माहिती मिळते.सातवीची परीक्षा दिलेल्या ही मुलगी आजीशी भांडून आपल्या जम्मूच्या मित्राकडे जाण्यास निघाली होती. दोन तरुणांनी फितवून तिला धारावीत नेले व दारू पाजून बलात्कार केला. उमेश कवडे (१९) आणि दिनेशकुमार यादव (२०) हे दोन आरोपी धारावी परिसरातील राहणारे आहेत. तर सलमान खान(२०) आणि राजू सिंह (२०) अशी चार आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी केलेल्या तपासात चौकशीत मुलीने चौघांपैकी एक मुकबधीर तर दुसऱ्याचे टोपण नाव सलमान असल्याचे सांगितले. या माहितीवरून कुर्ला पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये दिनेश कुमार या मुकबधीर आरोपीसह यादव, खान या तिघांना अटक केली. कवडे मात्र अद्यापही फरार आहे. मुलीची व तिन आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याचे अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती कुर्ला पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)