Join us
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची विशेष फेरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:32 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्यासाठी शनिवारी विशेष फेरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल.

मुंबई  - अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्यासाठी शनिवारी विशेष फेरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल.न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या चार याद्यांत जमा न झालेल्या मुंबई विभागातील अल्पसंख्याक कोट्यातील ५० हजारांहून अधिक जागा विशेष फेरीसाठी जमा झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना अनेक नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सकाळी ११ वाजतायादी जाहीर झाल्यानंतर २१ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रबातम्या