Join us  

पालिका म्हणते, २४ तास सुरू ठेवण्यासाठी विशेष परवानगीची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 6:26 AM

प्रजासत्ताक दिनापासून मुंबई नाइटलाइफसाठी सज्ज झाली आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनापासून मुंबई नाइटलाइफसाठी सज्ज झाली आहे. मात्र राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्यामुळे कोणतेही दुकान, मॉल्स, आस्थापना यांना २४ तास सुरू राहण्यासाठी महापालिकेकडून वेगळी परवानगी घ्यावी लागणार नाही. रात्रभर दुकाने, मॉल्स सुरू राहणार असल्याने कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, या आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा आणि आवश्यक परवाने असल्याची खातरजमा पालिकेला करावी लागेल.मुंबईत २६ जानेवारीपासून दुकान, मॉल्स, चित्रपटगृहे २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केली. त्यानुसार २४ तास व्यवसाय सुरू ठेवण्यास इच्छुक मॉल्स, दुकाने, आस्थापनांना अर्ज करण्याची सूचना करण्यात आली होती. आस्थापनांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यकता भासल्यास जादा सुरक्षा ठेवण्याबाबत निर्णय होईल. मात्र यात मोठी भूमिका पोलीस दल आणि अबकारी विभाग बजावणार आहे.२४ तास सुरू राहणाऱ्या आस्थापनांना पालिकेकडून वेगळी परवानगी घ्यावी लागणार नाही. मात्र या दुकाने, मॉल्सकडे पालिकेचा बांधकाम प्रस्ताव, परवाना विभागाची परवानगी असणे अपेक्षित आहे. २४ तास सुरू राहणाºया आस्थापनांकडे स्वत:चे प्रवेशद्वार, सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची तपासणी पालिका वेळोवेळी करेल. तेथील अग्निसुरक्षाही महत्त्वाची ठरणार आहे....त्यानंतरच निवासी भागासाठी परवानगीअनिवासी क्षेत्रातील नाइटलाइफचे यशापयश पाहून निवासी भागातील आस्थापना आणि उपाहारगृहांना २४ तास सेवा देण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र अग्निसुरक्षा आणि सुरक्षाव्यवस्थेची अटही पालिकेकडून संबंधितांना घालण्यात येणार आहे.स्वत:चे प्रवेशद्वार, सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मॉल आणि चित्रपटगृहांसारख्या आस्थापनांमधील दुकाने, उपाहारगृहे २४ तास सुरू ठेवता येणार आहेत.मुंबईची आर्थिक उलाढाल वाढेलमुंबई २४ तास सुरू राहण्यासाठी संबंधित मॉल्स, दुकाने, आस्थापनांना महापालिकेकडून त्यासाठी कोणतीही वेगळी परवानगी घ्यावी लागणार नाही. नाइटलाइफमुळे मुंबईतील आर्थिक उलाढाल वाढेल, याचा निश्चितच फायदा होईल.- प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महापालिका आयुक्त

टॅग्स :मुंबई महानगरपालिकानाईटलाईफ