Join us  

अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी विशेष समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:19 AM

मानवी अवयव व उती प्रत्यारोपण प्रक्रियेच्या निर्णयानंतर रुग्णाच्या नातेवाइकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण संचालनायात बऱ्याच येरझाऱ्या घालाव्या लागतात.

- स्नेहा मोरे मुंबई : मानवी अवयव व उती प्रत्यारोपण प्रक्रियेच्या निर्णयानंतर रुग्णाच्या नातेवाइकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण संचालनायात बऱ्याच येरझाऱ्या घालाव्या लागतात. मात्र, ही गुंतागुंतीची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.२५ पेक्षा अधिक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणाºया राज्यातील १६ रुग्णालयांमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि किंवा वैद्यकीय शिक्षण संचालनालय वा आरोग्य विभागाने नियुक्त केलेला सदस्य यांचा समावेश असणार आहे. ही समिती आरोग्य विभागाकडून संमती मिळालेल्या मानवी अवयव व उती प्रत्यारोपणाच्या प्रस्तावास अनुसरून मानवी अवयव प्राधिकार समितीची बैठक त्या-त्या रुग्णालय स्तरांवर आयोजित करेल. यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्यारोपणाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल.या समितीच्या स्थापनेकरिता १६ रुग्णालयांचे काही गट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या गटात बॉम्बे (मुंबई), जसलोक (मुंबई), पी.डी. हिंदुजा (मुंबई), व्होकार्ड (मुंबई) आणि कोकिलाबेन अंबानी (मुंबई) यांचा समावेश असून, या रुग्णालयांचे प्रमुख म्हणून समितीत मालवणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक काम पाहतील. तर ग्लोबल (मुंबई), फोर्टीस(मुंबई), ज्युपिटर (ठाणे) यांचे काम ठाण्याच्या मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पाहतील. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे काम पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पाहतील. तर आदित्य बिर्ला, दिनानाथ मंगेशकर, सह्याद्री, जहांगीर आणि रुबी रुग्णालयाचे काम पुण्याच्या मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पाहतील.अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बराच वेळ लागतो. आता ही विशेष समिती ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी रुग्णाच्या कुटुंबीय व नातेवाइकांना मार्गदर्शन करेल. मात्र, २५ पेक्षा कमी प्रत्यारोपण होत असलेल्या रुग्णालयांमध्ये नातेवाईक वा कुटुंबीयांना प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग वा वैद्यकीय शिक्षण विभागात यावे लागेल.- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग.

टॅग्स :अवयव दानवैद्यकीय