Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्बर रेल्वेमार्गावरील विशेष ब्लॉक पुढील आठवड्यात

By admin | Updated: February 11, 2016 03:48 IST

हार्बरवरील बारा डबा लोकलच्या कामासाठी सीएसटी येथे १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणारा ७२ तासांचा विशेष ब्लॉक ‘मेक इन इंडिया’साठी रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : हार्बरवरील बारा डबा लोकलच्या कामासाठी सीएसटी येथे १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणारा ७२ तासांचा विशेष ब्लॉक ‘मेक इन इंडिया’साठी रद्द करण्यात आला आहे. आता हा ब्लॉक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. मात्र त्याआधीच ३ फेब्रुवारीपासून ते ११ फेब्रुवारीपर्यंत सीएसटीत छोट्या कामांसाठी मध्यरात्री ब्लॉक घेऊन कामे करण्यात आली आणि त्यानंतर महत्त्वाच्या कामांसाठी ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र आता हाच ब्लॉक पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हार्बरवरील डॉकयार्ड रोड, कॉटनग्रीन आणि रे रोड स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे कामही बाकी असून हे काम पूर्ण होण्यास एक ते दोन महिनेही लागतील. या तीनही स्थानकांत प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी जागा उपलब्ध नसून त्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच एप्रिलनंतर नऊ डबा लोकल बारा डबा करण्याचे काम केले जाणार आहे. (प्रतिनिधी)