Join us  

मध्य रेल्वे चालविणार विशेष वातानुकूलित गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 3:40 AM

लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार वातानुकूलित द्वि-साप्ताहिक विशेष १५ आॅक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व गुरुवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हरिद्वारला पोहोचेल, तर हरिद्वार येथून ती १६ आॅक्टोबरपासून दर मंगळवार व शुक्रवारी सुटेल.

मुंबई : मध्य रेल्वे १५ आॅक्टोबरपासून ३ वातानुकूलित विशेष गाड्या चालविणार आहे. त्या पूर्णपणे आरक्षित असतील.लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार वातानुकूलित द्वि-साप्ताहिक विशेष १५ आॅक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व गुरुवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हरिद्वारला पोहोचेल, तर हरिद्वार येथून ती १६ आॅक्टोबरपासून दर मंगळवार व शुक्रवारी सुटेल.लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनौ वातानुकूलित साप्ताहिक विशेष १८ आॅक्टोबरपासून दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. लखनऊ येथून ती १८ आॅक्टोबरपासून दर रविवारी सुटेल. नागपूर-अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक विशेष १७ आॅक्टोबरपासून दर शनिवारी नागपूरहून सुटेल. अमृतसरवरून ती १९ आॅक्टोबरपासून दर सोमवारी सुटेल.या सर्व वातानुकूलित एक्स्प्रेसचे थांबे आणि वेळ नियमित वातानुकूलित एक्स्प्रेसप्रमाणेच असेल.

टॅग्स :मध्य रेल्वे