Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षकाची लाखाऐवजी १० हजारावर बोळावण

By admin | Updated: September 8, 2014 01:10 IST

राज्य शासनाने आदर्श शिक्षण पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची केलेली घोषणा हवेतच विरली

चिकणघर : राज्य शासनाने आदर्श शिक्षण पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची केलेली घोषणा हवेतच विरली. यंदा पुणे येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते देण्यात आले. मात्र, एक लाखाऐवजी १० हजारावरच पुरस्कारार्थीची बोळवन झाल्याने शिक्षक वर्गातून आश्चर्य व्यक्त होत असून शासनाने ‘बोले तैसा चाले’ याची पूर्तता करावी अशी मागणी शिक्षक संघटना मुख्यमंत्र्याची भेट घेऊन करणार असल्याचे पिसवलीचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविणारे अजय पाटील यांनी ही माहिती दिली. (वार्ताहर)