Join us

शिवसेनेच्या प्रचारात व्याख्याते अन् कलाकार

By admin | Updated: April 17, 2015 22:47 IST

बंडखोरीने त्रस्त झालेल्या शिवसेनेने आता आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील कलाकार आणि व्याख्यात्यांची मदत घेतली आहे.

नवी मुंबई : बंडखोरीने त्रस्त झालेल्या शिवसेनेने आता आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील कलाकार आणि व्याख्यात्यांची मदत घेतली आहे. यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पक्षाचे सचिव ‘होम मिनीस्टर’फेम आदेश बांदेकर, शिवचरित्रासह संभाजी महाराजांवर व्याख्याने देणारे नितीन बानगुडे-पाटील यांनी रोड शो केले आणि प्रचारसभा घेतल्या. यात बांदेकर यांनी नेरूळ येथे समीर बागवान, विक्की विचारे, निर्मला माने, काशिनाथ पवार, विद्या पावगे, रंगनाथ औटी, वाशीत सिंधू नाईक, कोपरखैरणेमध्ये मेघाली राऊत यांच्यासाठी रोड शो केला. यावेळी महिला संघटक रंजना शिंत्रे यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. तर बानगुडे -पाटील यांनी निर्मला कचरे, दमयंती आचरे, नरेंद्र खुलात यांच्यासाठी रोड शो, चौक सभा घेतल्या. गुरुवारी रात्री नेरूळ येथील तेरणा विद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा घेऊन आक्रमक शैलीत काँगे्रस-राष्ट्रवादीवर टीका करून शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.