मुरुड : महाशिवरात्रीनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ही जमात ३०० हून अधिक वर्षे येथे राहून रताळ्यांचा मळा पिकवून उदरनिर्वाह करतात.भाजी पिकवताना साधारण नोव्हेंबरमध्ये रताळ्याचे वाण लावले जाते. शंभर दिवसांचे पीक सर्वस्वी पाऊस व हवामानावर अवलंबून असते. मुरुडच्या बाजारात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला कोर्लईच्या ७० ते ७५ महिला विक्रेत्या प्रत्येक ४ ते ५ क्विंटल रताळी विक्रीसाठी आणतात. यंदा पीक उत्तम असले तरी रताळी मोठी ५० रु. मध्यम ३० रु. तर लहान आकाराची ६-२० रु. ने उपलब्ध आहेत. रताळी खरेदीसाठी हिंदू धर्मीयांइतकीच गर्दी मुस्लीम समाजाकडून होत असते. यातून जणू बाजारात राष्ट्रीय एकात्मता दिसत आहे. ग्राहक घासाघीस करीत असल्यामुळे प्रसंगी भावात सूट देवून दोन दिवसात माल संपवावा लागतो, असे बचत गटाच्या प्रमुख अंजलीन लुबीन डिसोजा सांगतात. रेवदंडा, नांदगाव, मजगाव येथे रताळींना चांगली मागणी असून वेगवेगळ्या प्रकारची ही रताळी दिसतात. मुरुडच्या रताळी बाजारात फेरफटका मारणे एक आनंददायी बाब वाटते. दरवर्षी मुरुड नगरपरिषदेतर्फे मोठा मंडप उभारण्यात येतो. पर्यटकांना या बाजाराचे मोठे अप्रुप वाटते. (वार्ताहर)
रताळ्यांनी केला उदरनिर्वाह
By admin | Updated: February 16, 2015 22:35 IST