Join us

विरारमधील ३,३०० घरांची लॉटरी लवकरच, म्हाडाकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:59 IST

हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील मुंबईकरांना म्हाडामुळे घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. विरार-बोळींजमधील ३३०० घरे नुकतीच कोकण मंडळाच्या ताब्यात आली असून, या घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुरू आहे.

मुंबई : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील मुंबईकरांना म्हाडामुळे घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. विरार-बोळींजमधील ३३०० घरे नुकतीच कोकण मंडळाच्या ताब्यात आली असून, या घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुरू आहे. या घरांची किंमतही कमी असेल.विरारमध्ये कोकण मंडळाकडून अंदाजे दहा हजार घरांचा प्रकल्प राबविला जात आहे. एकाच वेळेस काम सुरू असलेला म्हाडाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पात केवळ अल्प आणि मध्यम गटासाठीच घरे बांधण्यात येत आहेत. यातील जवळपास सहा हजार घरांची लॉटरी आधीच काढण्यात आली आहे. जून २०१४ मध्ये ४ हजार २७५ घरांची लॉटरी निघाली होती, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये ४ हजार २७५ घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया कोकण मंडळाकडून अजूनही सुरू आहे.आता याच प्रकल्पातील आणखी ३३०० घरांचे काम पूर्ण झाल्याने या घरांसाठीही लवकरच लॉटरी काढण्याची तयारी कोकण मंडळाने सुरू केली आहे. ही सर्व घरे अल्प गटातील आहेत.२०१४च्या लॉटरीत विरारमधील अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत २६ लाख १९ हजार ९०९ रुपये अशी निश्चित करण्यात आली होती, तर मध्यम उत्पन्न गटातील घराची विक्री किंमत ५० लाख २१ हजार ६१४ रुपये होती. मात्र, ही घरे महाग असल्याची टीका त्या वेळी कोकण मंडळावर झाली होती. त्यानंतर, अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत कमी करून, २४ लाख ७१ हजार ८५८ रुपये तर मध्यम उत्पन्न गटातील घरांची किंमत ४७ लाख ४२ हजार ६८६ रुपये करण्यात आली होती.फेब्रुवारी २०१६ मध्ये जेव्हा पुन्हा एकदा लॉटरी जाहीर झाली,तेव्हा अल्प गटातील घरांची किंमत२२ लाख, तर मध्यम गटातीलघरांची किंमत ४० लाख रुपये करण्यात आली होती.विचारविनिमय सुरूजी लॉटरी निघणार त्यात अल्प गटातील घरांच्या किमती अजून कमी करण्याचा कोकण मंडळाचा विचार सुरू आहे. त्या किंमती किती असतील आणि त्याची लॉटरी कधी जाहीर करायची, यावर सध्या अंतिम विचारविनिमय सुरू आहे.

टॅग्स :म्हाडामुंबई