Join us
Daily Top 2Weekly Top 5

मधु मंगेश कर्णिक यांना पुत्रशोक

By admin | Updated: September 3, 2015 01:18 IST

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचे कनिष्ठ पुत्र तन्मय कर्णिक यांचे लोकल अपघातात मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ५० वर्षांचे होते.

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचे कनिष्ठ पुत्र तन्मय कर्णिक यांचे लोकल अपघातात मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ अनुप आणि बहीण अनुजा असा परिवार आहे. बुधवारी दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंधेरी जीआरपीचे पोलीस उपनिरीक्षक बाबूराव डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.४८च्या सुमारास हार्बरच्या अंधेरी स्थानकात लोकलमधून उतरत असताना तन्मय कर्णिक यांचा हात निसटला. त्यात गंभीर जखमी झाले. कूपर रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री २.१५च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.