मुंबई : नशा करण्यासाठी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल लंपास करणाऱ्या उच्चशिक्षित लुटारूला गुन्हे शाखेने जेरबंद केले. हा २६ वर्षीय उच्चशिक्षित आरोपी मीरा रोड येथील राहणारा आहे.गेल्या काही महिन्यांपासून वांद्रे परिसरात महिलांना लुटण्याचे प्रमाण वाढले होते. एकट्याच रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील मोबाइल हे लुटारू लंपास करत होते. याबाबत वांद्रे आणि इतर पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल होते. मात्र हा चोरटा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर या लुटारूबाबत गुन्हे शाखा युनिट ५ च्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे परिसरात सापळा रचून या आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)
सोनसाखळी चोर गजाआड
By admin | Updated: October 24, 2014 05:42 IST