मुंबई : सिनेअभिनेत्री सोनम कपूर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजकोटला गेली असताना अचानक ताप आल्याने तिला स्टर्लिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले़ स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी सोनमच्या घशातील स्वाइब व रक्ताचे नमुने घेतले़ या नमुन्याचा वैद्यकीय अहवाल आला असून, तो पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ सध्या राजकोटमध्येच तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोनमला पुढील दोन दिवसांत मुंबईत हलविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ दरम्यान, अनिल कपूरही सोनमला भेटण्यासाठी राजकोटला रवाना झाल्याचे समजते़ यापूर्वी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोपडा यांनाही स्वाइन फ्लूची लागन झाली असून, त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
सोनम कपूरला स्वाइन फ्लू
By admin | Updated: March 1, 2015 00:30 IST