मुंबई : दिव्यांगांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन चांदिवली येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात आले. महाराष्ट्र राज्य टू व्हीलर्स यूजर्स असोसिएशनतर्फे चांदिवली येथील प्रभातनगरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
----------------------
अदानी ट्रान्समिशन, इलेक्ट्रिसिटी यांचा पुरस्काराने सन्मान
मुंबई : अदानी ट्रान्समिशनला बेस्ट कॉर्पोरेट बॉण्ड तर अदानी इलेक्ट्रिसिटीला बेस्ट न्यू बॉण्ड ॲवॉर्ड प्राप्त झाला. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई व उपनगरांतील ४०० चौरस किलोमीटर भागात पसरलेल्या ३ दशलक्षहून अधिक ग्राहकांची २ हजार मेगावॅट विजेची गरज पूर्ण करते, अशी माहिती अदानी ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाणा यांनी दिली.
----------------------