पूनम धुमाळ ल्ल गोरेगांव
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हय़ामध्ये घरफोडी, सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. या चोरीप्रकरणी माणगांवच्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रायगड जिल्हय़ातील 4क् घरफोडय़ांसह अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
मंगळसूत्र पळविण्याच्या प्रय}ात जेरबंद झालेल्या पती-प}ीची चौकशी केली असता, त्यांनी 4क् गुन्हय़ांची कबुली दिली. या आरोपींना 11 डिसेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासाच्या पहिल्याच दिवशी आरोपींच्या माणगांव येथील राहत्या घरी पोलिसांना मोठे घबाड सापडले आहे. यात 5 तोळे सोन्याचे दागिने, 12 किलो चांदीच्या मूर्ती, नागमूर्ती, पादुका, छत्री, मुखवटे, इतर वस्तू, गॅस सिलेंडर्स, पाण्याच्या मोटारी, तांबा-पितळेच्या व अॅल्युमिनिअमच्या वस्तू, समया, विविध मंदिरातून चोरलेल्या 22 लहानमोठय़ा दानपेटय़ा व रोख रक्कम 65क्क् जप्त करण्यात आले आहे. याठिकाणी घरफोडीसाठी लागणारे कटावणी, कटर, एक्साब्लेड व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रायगड जिल्हय़ातील माणगांव, गोरेगाव, o्रीवर्धन, म्हसळा, रोहा, रेवदंडा, नागोठणो, पाली, अलिबाग, पोयनाड, तळा, महाड तालुका व इतर ठिकाणी केलेल्या मंदिर चोरीचे 36 गुन्हे तसेच चेन स्नॅचिंगचे 4 गुन्हे उघडकीस आले असून आरोपींनी कबुली दिली आहे. माणगांव पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मंदिर चोरीमधील आरोपींचा साथीदार इलियास महमद अधिकारी (36 ) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता त्यास 12 डिसेंबर्पयत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आरोपी पती - पत्नीच्या दीड मजली घरामध्ये सापडलेल्या मुद्देमालासह आवारात असलेल्या विहिरीची व घरामध्ये जमिनीखाली देखील चीजवस्तू ठेवण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दिवसा मंदिर व परिसराची पाहणी करुन रात्रीच्या वेळी आरोपी चोरी करायचे. चोरी केलेला माल नेण्यासाठी सहआरोपी इलियास अधिकारी याची मिनीडोअर टेम्पोरिक्षा वापरत असल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.
आरोपी पती - पत्नीच्या घरात अनेक मंदिरातील दानपेटय़ा तसेच चोरीसाठी वापरण्यात येणा:या वस्तू आढळल्या.