लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओल्या कचऱ्यापासून खत आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याकरिता प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करातील सर्वसाधारण करात १० टक्के सूट देण्याच्या योजनेमुळे कचऱ्याचे प्रमाण १० मेट्रिक टन प्रतिदिनपर्यंत कमी होईल.
सुक्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरिता कुलाबा येथे सुका कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. प्रतिदन ४ टन क्षमता असलेल्या घरगुती घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्यासह कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत चेंबूर, देवनार, घाटकोपर, भायखळा, चारकोप येथे वायू गुणवत्ता मॉनिटरिंग स्टेशन स्थापित करण्यात येणार आहे. त्यामुळे सफरव्यतिरिक्त शहराच्या विविध भागांत वायू गुणवत्ता पातळीची वास्तविक माहिती तात्काळ प्राप्त होईल.
आश्रय योजना ३४ ठिकाणी राबविली जाईल. ३०० आणि ६०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या १२ हजार ६९८ सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी ५०० कोटींची तरतूद आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२७.३२ कोटींची तरतूद आहे.