Join us

अंधेरीत रिक्षा उलटून सैन्यातील जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रवास करत असताना रिक्षा उलटून झाल्याने घडलेल्या अपघातात सैन्यातील जवानाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रवास करत असताना रिक्षा उलटून झाल्याने घडलेल्या अपघातात सैन्यातील जवानाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यलप्पा वलप्पा नाईक (२८) असे मयत जवानाचे नाव आहे. ते मूळचे कर्नाटकचे राहणारे आहेत. वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वैद्यकीय कारणास्तव ते मुंबईला आले होते. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ते अंधेरी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून रिक्षाने निघाले होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षावरून चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती उलटली. त्यामुळे बेसावध बसलेले नाईक त्यातून खाली रस्त्यावर पडले. ज्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जागीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळाहून पसार झाला. याची माहिती वाकोला पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नाईक यांचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईक यांच्या नातेवाईकाना याबाबत कळविण्यात आले आहे.