Join us  

बुलेट ट्रेनसाठी होतेय मातीचे परीक्षण; मजबूत बांधकाम होणार अन् मग 'बुलेट ट्रेन' धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 10:33 AM

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये प्रकल्पस्थळी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये प्रकल्पस्थळी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. माती परीक्षणादरम्यान मातीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार असून, परीक्षणांती प्रकल्पातील कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने बांधकाम करायचे, याचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली.

प्रकल्पासाठी सध्या कोणती कामे सुरू आहेत?

मातीचे परीक्षण केल्याने संबंधित ठिकाणावरील जमिनीचा अंदाज येतो. त्यामुळे त्या ठिकाणी किती मजबूत बांधकाम करायचे, याचा आढावा घेतला जातो. राज्यात सध्या हे काम सुरू आहे. राज्यात बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या जमिनीवरील बांधकामास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा ते झरोली गावापर्यंत एकूण १३५ किमीमध्ये हे काम सुरू आहे.

भूगर्भातही तपासणी सुरू असून, हे काम ५०% पूर्ण झाले आहे. १०० टक्के जमीन संपादित झाली आहे.  स्वच्छतेची कामे सुरू असून, ही कामे ७८ किमी मार्गावर सुरु आहेत.

पालघर, ठाणे जिल्ह्यात असे सुरू आहे काम:

१) नदी पूल : उल्हास नदी, वैतरणा आणि जगनी, यापैकी प्रकल्पाचा सर्वात लांब पूल (२.३२ किमी) वैतरणा नदीवर बांधला जाणार आहे. एकूण लांबी १३५.४५ किमी (महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा ते झरोली गावादरम्यान)

२) व्हायाडक्ट आणि पूल : १२४ किमी

३) पूल आणि क्रॉसिंग : संख्या ३६, ज्यात ११ स्टील पूल आहेत.

४) स्थानके: ३ ठाणे, विरार आणि बोईसर

५) डोंगरातील बोगदे : ६  ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये प्रकल्पस्थळी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले.

टॅग्स :मुंबईबुलेट ट्रेन