Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोहेल बनणार गामा पहेलवान

By admin | Updated: June 11, 2014 00:46 IST

गामा पहेलवान या विषयाने जॉन आणि सलमान यांना आमने-सामने आणले आहे. दोघांनीही या नामी पहेलवानावरील चित्रपटांची योजना तयार केली आहे.

गामा पहेलवान या विषयाने जॉन आणि सलमान यांना आमने-सामने आणले आहे. दोघांनीही या नामी पहेलवानावरील चित्रपटांची योजना तयार केली आहे. यापूर्वीही भगतसिंह यांच्या जीवनावर तीन चित्रपट बनवण्यात आले होते. ते प्रदर्शितही एकाच दिवशी झाले होते. सलमान खान गामा पहेलवानावरील चित्रपटात आघाडीवर आहे; पण या चित्रपटात सलमान नव्हे, तर सोहेल गामा पहेलवानाची भूमिका निभावणार आहे. सोहेल सध्या लठ्ठ दिसत आहे. या भूमिकेसाठी एका फिट अभिनेत्याची गरज होती. त्यामुळे पुनित इस्सर या दिग्दर्शकाने सोहेलला फिट होण्याचा सल्ला दिला होता. सोहेल या भूमिकेसाठी कुस्तीपटू सुशील कुमारची मदत घेणार आहे.