मुंबई : गृहनिर्माण सोसायटीच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना, विविध कर्मचाऱ्यांच्या वेतन खर्चाच्या बहाण्याने २३ लाख ४० हजार रुपये बॅँकेतून परस्पर काढून घेणा-या एका भामट्याला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. दीपक शंकर लोखंडे (वय ३१) असे त्याचे नाव असून, तो पोलीस कोठडीत आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत त्याने ही फसवणूक केली आहे.मालाड (प.) लिंक रोडवरील लिंक वेइस्टेट प्रिमायसेस को.आॅरेटिव्ह सोसायटीत लोखंडे हा गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत व्यवस्थापक म्हणून काम पाहात होता. या कालावधीत त्याने वॉचमन, वायरमन, प्लंबर, ड्रेनेज क्लीनर, सफाई कामगार यांच्या नावे बिल बनवून सोसायटीचे चेअरमन, खजिनदार यांच्या चेकवर स्वाक्षºया घेतल्या. त्यानंतर, त्याच्या रकमेमध्ये परस्पर फेरफार करून बॅँकेतून रक्कम काढून घेतली. ५ महिन्यांत त्याने तब्बल २३ लाख ४० हजार रुपये काढून घेतले होते. फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सोसायटीच्या सचिवांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सोसायटीला २४ लाखांना गंडा घालणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:49 IST