मुंबई : लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीदरम्यानही राजकीय पक्षांच्या संभाव्य आणि अधिकृत उमेदवारांनी आपला प्रचार-प्रसार करण्यासाठी सोशल नेटवर्क साइट्सवर भर दिला असून, राजकीय पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटत नसला तरीदेखील फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅपवर प््रचार आणि प्रसाराची रणधुमाळी उडाली आहे.विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच सोशल नेटवर्क साइट्सवर ‘इलेक्शन वॉर’ रंगले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि मग शिळ्या कढीला ऊत आला. विशेषत: फेसबुक आणि टिष्ट्वटरच्या तुलनेत व्हॉट्सअॅपने यात आघाडी घेतली. मुळात तळहातावर मावणाऱ्या मोबाइलमध्ये व्हॉॅट्सअॅप असल्याने प्रचार आणि प्रसारात व्हॉॅट्सअॅपने आघाडी घेतली. विशेषत: आघाडी सरकारमधील मंत्रिपदे भूषविलेल्या मत्र्यांनीदेखील प्रचार आणि प्रसारासाठी व्हॉट्सअॅपचा आधार घेतला आहे.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मैदानातील कुरघोडींना अद्याप सुरुवात झाली नसली तरी सोशल नेटवर्क साइट्सवर राजकीय कुरघोडी सुरू झाल्या आहेत. फेसबुकवरील अकाउंट्सची मर्यादा संपल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले स्वतंत्र पेज करण्यावर भर दिला आहे. (प्रतिनिधी)
सोशल नेटवर्कवर रणधुमाळी!
By admin | Updated: September 26, 2014 01:50 IST