Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रमातून दिला सामाजिक संदेश

By admin | Updated: August 16, 2014 01:17 IST

मनोर परिसरात ६८ वा स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा, महाविद्यालय, हायस्कूलमध्ये मुलांनी देशासाठी प्राण दिलेल्या हुतात्म्यांची कार्यक्रम, नाटक, गीतातून आठवण करून दिली

मनोर : मनोर परिसरात ६८ वा स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा, महाविद्यालय, हायस्कूलमध्ये मुलांनी देशासाठी प्राण दिलेल्या हुतात्म्यांची कार्यक्रम, नाटक, गीतातून आठवण करून दिली. जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात टेन गाव ते टेन नाक्यापर्यंत प्रभात फेरी काढली, तसेच अनेक शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.वांगर गुरुकुल शाळेतील मुलांनी भगत सिंग व इतर स्वातंत्र्यवीरांची आठवण करून देणारे, त्यांच्या कार्याची माहिती देणारे नाटक सादर केले. विद्या विनोद अधिकारी महाविद्यालय, लालोंडे येथील मुलांनी भक्तीगीताचे कार्यक्रम आयोजित केले होते. टेन, मनोर, दुर्वेस, चेंबूर, करडगाव, नांदगाव, तामसई, नेटाळी, मासवण, धुकटन अशा अनेक शाळांत ६८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच पोलीस स्थानक, वन विभाग कार्यालय, संस्था, बँका अशा अनेक शासकीय कार्यालयातही झेंडा वंदन करुन राष्ट्रगीत सादर करण्यात आले. (वार्ताहर)