Join us  

आतापर्यंत मुंबईत ११४६ जणांना कोरोना, ७६ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 2:12 AM

७६ जणांचा बळी । ६५, ७० टक्के जणांना अति सौम्य आणि सौम्य लक्षणे

मुंबई : मुंबईला कोरोनाचा विळखा तासागणिक घट्ट होत असून आरोग्य यंत्रणेसमोर कोरोना नष्ट करÞण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दाटीवाटीच्या वस्तीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असून या पार्श्वभूमीवर घरोघरी स्क्रिनिंंग सुरू झाले आहे. शहर उपनगरात शनिवारी १३८ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार १४६ इतकी झाली आहे. तर शनिवारी ११ मृत्यूंची नोंद झाली असून आता बळींचा आकडा ७६वर पोहोचला आहे.

काटेकोरपणे सामाजिक अंतर राखून संपर्क टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता आणि ५३१ पॉझिटिव्ह कोविड रुग्ण सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि सर्वेक्षणाअंतर्गत कोविड संशयित रुग्णांचा शोध यामुळे सापडला जाईल. मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या असून एक हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. बाधित रुग्णांमध्ये ६५ ते ७० टक्के लोकांना अति सौम्य आणि सौम्य लक्षणे आढळली आहेत. सेव्हन हिल रुग्णालयांमध्ये ३०० खाटा अत्यवस्थ रुग्णांसाठी असून या रुग्णालयात रुग्णांसाठी उपचारांची व्यवस्था आहे. नऊ मृत्यूंची निश्चिती, शनिवारी दोन मृत्यू, दीर्घकालीन आजारांच्या मृत्यूंचे प्रमाण जास्त, मुंबई शहर उपनगरात पालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी ११ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची निश्चिती केली. त्यात ५, ६ आणि ७ एप्रिल रोजी प्रत्येकी एक, ९ आणि १० एप्रिल रोजी अनुक्रमे चार व दोन मृत्यू झाले. ११ मृत्यूंमध्ये चार महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांपैकी ७० टक्के रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारखे दीर्घकालीन आजार होते. शनिवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

याखेरीज, मधुमेहाचा त्रास असलेल्या ४८ वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील एकूण मृत्यूंची संख्या ७५ वर पोहोचली आहे. ८६१ संशयितांचे नमुनेमुंबईतील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित कोरोना (कोविड-१९) रुग्ण शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत.च्आतापर्यंत शहर उपनगरात ६० क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये २ हजार २४८ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ८६१ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत.केईएम रुग्णालयातील २२ जण क्वारंटाइन, एक वैद्यकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, केईएम रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.च्शस्त्रक्रिया विभागात काम करणाºया १५ चतुर्थश्रेणी कामगार आणि ७ परिचारिका यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी दोन चतुर्थश्रेणी कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे आम्हालाही सुरक्षा द्यावी, तसेच अत्यावश्यक सेवेतील सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टर्स यांची त्वरित रिक्त पदे भरण्यात यावीत, असेही कामगारांचे म्हणणे आहे.च्कारण काही कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव, तर काही कर्मचाºयांना क्वारंटाइन केल्यामुळे रुग्णसेवेसाठी कर्मचाºयांचा तुटवडा जाणवतो, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या