Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत एक कोटी ६३ लाखांहून अधिक लाभार्थींना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:08 IST

मुंबई : राज्यात रविवारी ४७ हजार ६९३ लाभार्थींना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण एक कोटी ६३ लाख ६२ ...

मुंबई : राज्यात रविवारी ४७ हजार ६९३ लाभार्थींना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण एक कोटी ६३ लाख ६२ हजार ८९५ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ११ लाख दहा हजार ७९१ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर सहा लाख ३४ हजार ९५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १४ लाख ३२ हजार ६६२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, पाच लाख ३० हजार ३१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे तर सामान्य लाभार्थींच्या लसीकरणात एक कोटी ११ लाख ५१ हजार १०६ लाभार्थींना लसीचा पहिला डोस देण्यात आला, तर १५ लाख तीन हजार ३४८ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जिल्हा लाभार्थी

मुंबई २४,९२,८४१

पुणे २२,९४,८०७

ठाणे १२,९९,४४८

नागपूर १०,०६,०००

नाशिक ७,५८,३०१