Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत ६ कोटी २९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात रविवारी १ लाख ७६ हजार ८८७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ६ ...

मुंबई : राज्यात रविवारी १ लाख ७६ हजार ८८७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ६ कोटी २९ लाख ५१ हजार ४४४ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात २१ लाख ४० हजार ९८७ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १५ लाख ३९ हजार २ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ११ लाख ६६ हजार ६८३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी १९ लाख ३१ हजार २९० लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील २ कोटी १० लाख ८७ हजार ४६० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २७ लाख ७८ हजार ४६५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १२ लाख ९२ हजार ७९७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख १४ हजार ७६० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.