Join us

राज्यात आतापर्यंत १ कोटी ६४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:10 IST

मुंबई : राज्यात सोमवारी ७९ हजार ४९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण १ कोटी ६४ लाख ...

मुंबई : राज्यात सोमवारी ७९ हजार ४९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण १ कोटी ६४ लाख ४६ हजार ९९४ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात पहिला डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ११ लाख ११ हजार ४२० आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख ३५ हजार ९८४ आहे. राज्यात पहिला डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या १४ लाख ३६ हजार ६७० आहे, दुसरा डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाख ३३ हजार ३७ इतकी आहे. राज्यात पहिला डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांची संख्या १ कोटी १२ लाख ९ हजार २०९ असून दुसरा डोस घेतलेल्या सामान्य लाभार्थ्यांची संख्या १५ लाख २० हजार ६७४ आहे.

जिल्हा लाभार्थी

मुंबई २४९६०५९

पुणे २२९८६३२

ठाणे १३०६५३७

नागपूर १०१५२९३

नाशिक ७६१९८३