Join us  

आतापर्यंत ६५० कोटींची कर्जमाफी! सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

By अतुल कुलकर्णी | Published: October 31, 2017 11:59 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सरकारने देऊ केलेल्या कर्जमाफी अंतर्गत मंगळवारपर्यंत (३१ आॅक्टोबर) ६५० कोटी रुपयांची कर्जमाफी देऊ केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सरकारने देऊ केलेल्या कर्जमाफी अंतर्गत मंगळवारपर्यंत (३१ आॅक्टोबर) ६५० कोटी रुपयांची कर्जमाफी देऊ केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ग्रीन लिस्टनुसार जवळपास आज अखेर जवळपास १ लाख शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.कर्जमाफीची नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची मंगळवारी बैठक झाली. त्यात कोणत्या विभागाने काय केले, सहकार विभागाच्या अडचणी कोणत्या आहेत, बँकांनी या कामासाठी किती वेग दिला आहे, आयटी विभागाचे प्रश्न काय आहेत, याचा आढावा यावेळी घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समितीचे सदस्य सहकार मंत्री सुभाष देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर उपस्थित होते.सरकारला किमान ५० ते ५५ लाख शेतकºयांना कर्जमाफी द्यायची आहे. या गतीने हे काम कधी पूर्ण होणार? याचा कालबध्द कार्यक्रम तयार करा, अशी सूचनाही यावेळी बैठकीत करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत ज्या पध्दतीने अधिकाºयांनी या योजनेत अडथळे निर्माण केले, कामात चालढकल केली त्यावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र आघाडी सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यापासून ती प्रत्यक्षात हातात पडेपर्यंतचा कालावधी जवळपास दीड वर्षाचा होता; पण आपल्या सरकारने कर्जमाफी जाहीर करुन अवघे काही महिने झाले आहेत. शिवाय, आपण यात पारदर्शकता आणून जनतेचेच पैसे वाचवले आहेत, ही माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचवली पाहिजे, अशी चर्चाही यावेळी झाली.सध्या ग्रीन लिस्टमध्ये नावे असणा-या शेतक-यांचे खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी एलो लिस्टची देखील छाननी सुरु करण्यात आली असून त्या कामांना गती द्या, अशी सूचनाही या बैठकीत देण्यात आली.डोंगर पोखरून उंदीर काढला!राज्यातील ८९ लाख शेतक-यांना दिवाळीच्या आधी कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा करणा-या भाजपा शिवसेना सरकारने दिवाळी होऊन गेली तरी फक्त एक लाख शेतक-यांना अवघी ६५० कोटीची कर्जमाफी देऊ केली आहे. हा तर डोंगर पोखरुन उंदीर काढण्याचा प्रकार असल्याचा उपहासात्मक टोला राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला.

टॅग्स :शेतकरी