Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ...

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

शुक्रवारपर्यंत राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ४९ लाख ५७ हजार ६८५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ६७ हजार ७७१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख २९ हजार ३१४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २० लाख ८४ हजार ३६२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर ८ लाख ९६ हजार ९५० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६१ लाख ४७ हजार ५३८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.