Join us  

...म्हणून अभिनेत्री मालवी मल्हाेत्रा वाचली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 6:15 AM

तरुणाने प्रसंगावधान दाखलत हल्लेखाेराला अडवत जखमी अभिनेत्रीला रुग्णालयात केले दाखल

मुंबई : वर्सोव्यात रस्त्यात अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला होत असताना स्थानिकांनी पळ काढला. मात्र सायकलिंग करणाऱ्या रविष रहेजा नामक तरुणाने प्रसंगावधान राखत हल्लेखोर योगेश सिंह याला अडवत तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तिचा जीव वाचला.हल्लेखोर सिंहने मालवीवर चाकूने हल्ला केला, त्याआधी तो तिला बळजबरीने त्याच्या कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र मालवीने त्याला धक्का देत पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिंह तिच्या मागे धावत गेला आणि तिच्यावर चाकूहल्ला केला. जवळपास तीन वेळा तिच्यावर वार केले. ते पाहताच सायकलवरून तेथे आलेल्या रहेजाने सिंहचा हात धरला आणि त्याला बाजूला केले. तेव्हा सिंह कारमध्ये बसून फरार झाला. तर रहेजाने अन्य स्थानिकांच्या मदतीने तिला रिक्षात बसवले. रिक्षाच्या मागोमाग सायकल चालवत रहेजा अंबानी रुग्णालयात पोहोचला आणि मालवीला त्याने तेथे दाखल केले. मालवीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून सिंहला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. वसईच्या रुग्णालयात तो दाखल असून लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

टॅग्स :मुंबई