Join us
Daily Top 2Weekly Top 5

सविता मालपेकर यांच्या गळ्यातली चेन हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:06 IST

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी सविता मालपेकर यांच्या गळ्यातली चेन चोरट्याने हिसकावल्याची घटना सोमवारी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर घडली. सोमवारी रात्री ...

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी सविता मालपेकर यांच्या गळ्यातली चेन चोरट्याने हिसकावल्याची घटना सोमवारी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर घडली. सोमवारी रात्री ९ वाजता शिवाजी पार्कला फेरी मारून त्या कट्ट्यावर बसल्या असताना, एक माणूस त्यांना वेळ विचारण्यास आला. मात्र वेळ सांगण्यास सविता मालपेकर यांनी नकार दिला. तरी त्याने त्यांचा पिच्छा पुरवला आणि या अवधीत त्याने त्यांच्या गळ्यातील चेन खेचली व तो पळून गेला.

याबाबत माहिती देताना सविता मालपेकर म्हणाल्या, हे घडत असताना मी आरडाओरड केली, तेव्हा लोक जमले. मात्र तोपर्यंत चोरटा बाइकवरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या पार्श्वभूमीवर सविता मालपेकर यांनी, शिवाजी पार्कच्या सर्वच प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे. शिवाजी पार्क हे गर्दीचे ठिकाण आहे. येथे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांचा वावर असतो. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.