Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरेच्या पालिका शाळेत सापडला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव (पूर्व ) येथील आरे कॉलनी शाळेच्या आवारातील वडाच्या चौथऱ्याजवळ सोमवारी विषारी साप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव (पूर्व ) येथील आरे कॉलनी शाळेच्या आवारातील वडाच्या चौथऱ्याजवळ सोमवारी विषारी साप आढळला. या सापाला सर्पमित्रांच्या मदतीने जंगलात सोडण्यात आले.

कोरोनामुळे सध्या शाळा जरी बंद असल्या तरी शासनाच्या नियमानुसार ५० टक्के शिक्षकांनी शाळेत येणे अनिवार्य आहे. त्यातच पालिकेचे विद्यार्थी हे शासनाकडून मिळणारे तांदूळ, हरभरा व डाळ घेण्यासाठी तसेच वर्कशीट सबमिट करण्यासाठी सोमवारी शाळेत येणार होते. मात्र त्याआधीच सापाला पकडण्यात यश आल्याने येथील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

सध्या कोविड-१९ मध्ये शाळा बंद असल्याने व विद्यार्थ्यांची वर्दळ नसल्याने शाळेतील आवारात सर्प फिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे साप कधी कधी वर्गातही येतात. तसेच ही शाळा आरे कॉलनीमध्ये युनिट क्रमांक १६ येथील वस्तीपासून दूर टेकडीवर असल्याने येथे बिबट्याचाही वावर असतो. तसेच या ठिकाणी या दिवसात मोरही नजरेस पडतो. बऱ्याचदा येथील सफाई कामगारांना सकाळी वर्गाची सफाई करताना वर्गात व शाळेत सर्प दिसला आहे, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.

--------------------