Join us

जिल्ह्यात सर्पदंश वाढले

By admin | Updated: November 8, 2014 22:21 IST

भात कापणीचा हंगाम सुरु झाला की जिल्ह्यात संर्पदंश आणि विंचूदंशांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यंदा जिल्ह्यात 1क् महिन्यात 1 हजार 6क्8 विंचूदंशाचे तर 1 हजार 372 सर्पदंशाचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.

जयंत धुळप - अलिबाग
भात कापणीचा हंगाम सुरु झाला की जिल्ह्यात संर्पदंश आणि विंचूदंशांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यंदा जिल्ह्यात 1क् महिन्यात 1 हजार 6क्8 विंचूदंशाचे तर 1 हजार 372 सर्पदंशाचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्या पैकी सर्पदंशाच्या दोन रुग्णांचा अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 
गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्पदंश आणि विंचूदंशचे प्रमाण वाढले असले तरी त्यामुळे होणा:या मृत्यूंच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय, माणगांव, पेण, कजर्त, रोहा व श्रीवर्धन अशी पाच उप जिल्हा रुग्णालये तर उरण, महाड, जसवली, मुरुड, पोलादपूर, पनवेल, चौक आणि कशेळे(कजर्त) ही आठ ग्रामीण रुग्णालये अशा जिल्ह्यातील 14 ठिकाणी  सर्पदंश आणि विंचूदंशावर तत्काळ उपचार उपलब्ध होत असल्याने सर्पदंश आणि विंचूदंशाच्या मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली आहे.
सर्व साधारणपणो भात कापणीच्या वेळी सर्पदंशाच्या प्रमाणात वाढ होते. याच काळात ऑक्टोबर हिट असल्याने सरपटणारी जनावरे पाणथळी वा ओलसर जमिनींकडे येतात. अनेकदा भाताच्या पेंढय़ाखाली ते गारव्याच्या शोधात येतात. त्यामुळे भातच्या पेंढय़ा उचलताना सर्प दंश अधिक प्रमाणात झाल्याची उदाहरणो आहेत. 
जिल्ह्यात विंचूदंशाचे प्रमाण वाढले असले तरी त्यामुळे होणा:या मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. ऑक्टोबर हिटमध्ये विंचू मोठय़ा प्रमाणात आढळतात आणि गारव्याकरीता भाताच्या भा:याखाली वास्तव्य करतात. त्यामुळे भारे हलविताना विंचूदशांचे प्रमाण वाढलेले दिसते. 
सर्प वा विंचू दंश झाल्यावर तत्काळ सरकारी रुग्णालयात रुग्णास आणल्यास त्यावर त्वरीत योग्यते उपचार  होत असल्याने या दोन्हीतील मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प होत चालेले आहे, हे गेल्या पाच वर्षाच्या रायगडच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परंतु आजही ग्रामीण भागात सर्प वा विंचू दंश झाल्यावर त्याचे विष उतरवण्याकरीता मांत्रिक वा भगताकडे रुग्णास नेले जाते. त्यात रुग्णाचा मृत्यू होतो. सर्प दंश वा विंचू दंश झाल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात रुग्णास दाखल करावे वा 1क्8 हा टोल फ्री कंमांक फिरवून रुग्णवाहीका बोलावून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणोने केले आहे.
 
गेल्या पाच वर्षात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक सर्पदंशाचे रुग्ण 2क्12  मध्ये 2 हजार 154 होते. याच वर्षी संर्प दंशाचे सर्वाधिक 13 मृत्यू होते. यंदा 15 ऑक्टोबर अखेर अलिबाग मध्ये 349, माणगांव मध्ये 163,पेण मध्ये 179, कजर्त मध्ये 15क्, रोहा मध्ये 11क्, श्रीवर्धन मध्ये 33, उरण मध्ये 44, महाड मध्ये 97, मुरुड मध्ये 15, पोलादपूर मध्ये 24, पनवेल मध्ये 123, चौक (खालापूर) मध्ये 52 तर कशेळे (कजर्त) मध्ये 33 असे एकुण 1372 सर्प दंशाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
 
गेल्या पाच वर्षात सर्वाधिक विंचूदंश 2क्13 मध्ये 2149 आहेत. तर दोन मृत्यू 2क्12 मध्ये झाले आहेत. यंदा 15 ऑक्टोबर्पयत सर्वाधिक विंचूदंशाची नोंद माणगांवमध्ये 354  इतकी झाली आहे. या व्यतिरिक्त अलिबागमध्ये 236, पेण 153, कजर्त 272, रोहा 127, श्रीवर्धन 3क्, उरण 3क्, महाड 68, जसवली 14, मुरुड 19, पोलादपूर 95, पनवेल 98, चौक (खालापूर) 64 तर कशेळे (कजर्त)48 असे एकूण 16क्8 विंचूदंशाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत.