Join us
Daily Top 2Weekly Top 5

चप्पलमधून हेरॉईनची तस्करी

By admin | Updated: August 25, 2015 05:06 IST

गुन्हे शाखेच्या विविधी युनीटसनी मिळून हिराबाई शिंदे(४०), शाबीर शकील शेख(२८) या दोघांना बोरिवली एसटी स्टॅण्ड परिसरातून गजाआड केले. यापैकी हिराबाई ही भिवंडीतील

मुंबई : गुन्हे शाखेच्या विविधी युनीटसनी मिळून हिराबाई शिंदे(४०), शाबीर शकील शेख(२८) या दोघांना बोरिवली एसटी स्टॅण्ड परिसरातून गजाआड केले. यापैकी हिराबाई ही भिवंडीतील नामचीन अंमलीपदार्थांची विक्रेती असून शाबीर चरसी आहे. दोघांकडून एकूण २११ ग्रॅम हेरॉईन सापडले. बाजारपेठेत त्याची किंमत ६ लाख ३३ हजार इतकी आहे.हेरॉईनच्या साठयासह महिला व पुरूष बोरिवली परिसरात येणार अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेकडे होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अंधेरी व वांद्रे युनीट तसेच अंमलीपदार्थविरोधी पथकाचे कांदिवली युनीट कामाला लागले. या पथकाने बोरिवली पूर्वेकडील सुकूरवाडी एसटी स्टॅण्डजवळ सापळा रचला. त्यात हिराबाई व शाबीरला संशयास्पद हालचालींवरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. हिराबाईकडील पिशवीत १०० ग्रॅम हेरॉईन सापडले. तर शाबीरने आपल्या चप्पलेत उर्वरित हेरॉईन दडवल्याचे झाडाझडतीत निष्पन्न झाले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शाबीरकडे हेरॉईन आहे याची कल्पना आम्हाला नव्हती. मात्र तो अचानक लंगडू लागला. चौकशीसाठी कार्यालयात आणले तेव्हा त्याने चप्पल बाहेर काढून ठेवली. त्यानंतर त्याचे लंगडणे बंद झाले. ही बाब आमच्या लक्षात आली. त्याच्या चप्पलेचे सोल नव्याने शिवलेले हाते. कुतूहलादाखल चप्पलेला टोच्या मारला तेव्हा त्यातून तपकीरी रंगाची भुकटी बाहेर पडली. अख्खे सोल बाजुला केले तेव्हा त्यात एक प्लास्टीकची पिशवी व त्यात दडवलेले हेरॉईन सापडले. (प्रतिनिधी)