Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील रुग्णसंख्येत किंचित घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:06 IST

दिवसभरात ४४६ कोरोनाबाधित; ११ मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा घट दिसून आली. दिवसभरात ...

दिवसभरात ४४६ कोरोनाबाधित; ११ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा घट दिसून आली. दिवसभरात ४४६ बाधित रुग्ण आढळून आले, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०७ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ९५१ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख ३० हजार २४१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख पाच हजार २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६७८ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार ९७३ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांपैकी आठ रुग्णांना सहव्याधी होत्या.

मृतांमध्ये सात पुरुष तर चार महिला रुग्णांचा समावेश होता. आठ मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर तीन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३५ हजार ३६२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण ७७ लाख ३९९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.