Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील इमारतीचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील लिंक रोडवरील भक्ती पॅलेस या इमारतीच्या एका घराचा हॉलचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील लिंक रोडवरील भक्ती पॅलेस या इमारतीच्या एका घराचा हॉलचा स्लॅब शनिवारी पहाटे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर धोकादायक असलेल्या या इमारतीतील १९ नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. या इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्यासह भक्ती पॅलेस येथे भेट दिली, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी परिमंडळ ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार तसेच इतर पक्षांचे लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. झालेल्या नुकसानाची या वेळी पाहणी करण्यात आली.

...............................................................