Join us

स्कायवॉकची अवस्था बिकट

By admin | Updated: August 19, 2014 23:54 IST

नागरिकांच्या सोयीसाठी बनविण्यात आलेले स्कायवॉक सध्या नागरिकांच्या मनोरंजनाचे आणि क्षणभराच्या विसाव्याचे ठिकाण बनले आहे.

विरार : रस्ता क्रॉसिंग करताना अपघाताची मालिका रोखण्यासाठी खास नागरिकांच्या सोयीसाठी बनविण्यात आलेले स्कायवॉक सध्या नागरिकांच्या मनोरंजनाचे आणि क्षणभराच्या विसाव्याचे ठिकाण बनले आहे. गर्दुल्यांचा संसार आणि प्रेमीयुगुलांच्या प्रेमप्रकरणाचे ठिकाण बनलेले हे स्कायवॉक सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीऐवजी गैरसोयीचेच बनल्याचे सध्या दिसून येत आहे. 
लाखो रुपये खर्च करून प्रवाशांना प्रवास सोयीचा व्हावा म्हणून स्कायवॉक बांधण्यात आले. वसई- विरार परिसरात त्यांची संख्या अधिक आहे. अपघातजन्य रस्त्यावरून नागरिकांना सहीसलामत जाता यावे यासाठी शासनाने राबविलेला हा उपक्रम सुरूवातील फायदेशीर वाटला  तरी आता मात्र हे स्कायवॉक डोईजड झाल्याचे दिसून येत आहे. या स्कायवॉकवरून चुकून कुटुंबियांसोबत जावे असे वाटल्यास तेथून जाणो म्हणजे डोळे बंद करून जाण्याशिवाय पर्याय नाही असाच काहीसा प्रकार  येथे दिसून येतो. याशिवाय येथे उभ्या केलेल्या पिलरवर जागोजागी अश्लील भाषेत वाट्टेल ते लिहिल्याने महिलावर्गाला नजर खाली घालूनच चालावे लागत आहे.  (वार्ताहर)
 
सुरक्षारक्षकांच्या झोपा 
4महाविद्यालयात गेलेली 
मुले- मुली या स्कायवॉकच्या एकांताचा फायदा घेऊन अश्लील चाळे करताना दिसून येत आहेत, तर त्यांना येथे अटकाव करण्याऐवजी येथे असलेले सुरक्षारक्षक निव्वळ झोपा काढण्याचेच काम करताना दिसतात, तर गर्दुल्यांनीही येथे आपला दुसरा संसार मांडलेला दिसून येत आहे. 
4त्यामुळे रात्री- बेरात्री या मार्गावरून जाणो- येणो निव्वळ धोकादायक बनलेले आहे. 
4येथे सुरक्षेसाठी जे लोखंडी 
रॉड लावलेले आहेत तेही 
अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होण्याची 
दाट शक्यता वर्तविली 
जात आहे.