Join us

लिपिकास लाच घेताना अटक

By admin | Updated: August 11, 2014 23:18 IST

दोन हजार रुपये स्वीकारताना वेश्वी ग्रामपंचायतीचा लिपिक सुरेश काशिनाथ शेळके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी संध्याकाळी रंगेहाथ अटक केली आहे

अलिबाग : बांधकाम व्यावसायिकाने ग्रामपंचायतीच्या केलेल्या कामाचे बिल अदा करण्याकरिता अडीच हजारांची लाच मागून त्यापैकी दोन हजार रुपये स्वीकारताना वेश्वी ग्रामपंचायतीचा लिपिक सुरेश काशिनाथ शेळके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी संध्याकाळी रंगेहाथ अटक केली आहे.२०११ मध्ये वेश्वी ग्रमपंचायतीतील गोंधळपाडा सर्वे.नं.५५ अ या जागेला तारेचे कुंपण घालण्यात आले. त्यावेळी कामाच्या एकूण रकमेपैकी ३२ हजारांची रक्कम येणे बाकी होते. ही रक्कम व पूर्वी केलेल्या कामाचे ७५ हजार ३८५ रुपये बिल अदा करण्याकरिता लिपिक सुरेश शेळके याने कंत्राटदाराकडे २५०० रुपये लाच मागितली होती. (विशेष प्रतिनिधी)