Join us

सहाव्या मजल्यावरून आईनेच अर्भकाला फेकले

By admin | Updated: January 20, 2015 02:22 IST

अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला आईनेच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील अंटालिका इमारतीत घडली आहे.

मुंबई : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला आईनेच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील अंटालिका इमारतीत घडली आहे. या मातेविरोधात वर्सोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जे. पी. रोड येथील अंटालिका इमारतीच्या कम्पाउंडमध्ये एक नवजात अर्भक आढळल्याची माहिती इमारतीच्या सुरक्षारक्षकाने १५ जानेवारीच्या रात्री पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्या अर्भकाला कूपर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाव्या मजल्यावरील एका व्यावसायिकाच्या घरी रुबिना नावाची मोलकरीण गरोदर असल्याती माहिती तपासात पुढे आली. तसेच १५ तारखेला तिला कूपर रुग्णालयात दाखल केले होते.पोलिसांनी या व्यावसायिकाकडे चौकशी केली असता रुबिनाला वेदना जाणवू लागल्या तसेच घरात काही ठिकाणी रक्त दिसल्यामुळे तिला कूपर रुग्णालयात दाखल केल्याचे त्याने सांगितले. अर्भकाबद्दल त्याने अनभिज्ञता दर्शविली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता, वेगळीच माहिती पोलिसांच्या हाती आली. रुबिनाला गुरुवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला वेदना होऊ लागल्यानंतर तिची प्रसूती बाथरूममध्ये झाली. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला तिने घाबरून कपड्यात बांधून सोसायटीच्या बाहेर फेकले. मात्र ते कम्पाउंडच्या आत पडले, तशी माहिती तिने डॉक्टरांना दिली होती. (प्रतिनिधी)मूळची कर्नाटकची असलेली रु बिना दीड वर्षापासून मोलकरीण म्हणून काम करते. अधूनमधून ती गावी जात असे़ त्यादरम्यान तिचे एका तरु णाशी अनैतिक संबंध निर्माण झाले़ त्यातून ती गरोदर राहिली होती. उपचारानंतर तिला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनय कुलकर्णी यांनी दिली.