Join us

बहिणीवर सहा वर्षे बलात्कार

By admin | Updated: April 1, 2016 02:45 IST

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर दोन नराधमांनी सहा वर्षे बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मालवणीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावांना बुधवारी अटक

मुंबई : सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर दोन नराधमांनी सहा वर्षे बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मालवणीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावांना बुधवारी अटक केली आहे.मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही सतरा वर्षांची असून ती तिचे आईवडील आणि पाच भावंडांसोबत राहते. ज्यात तीन भावांचा समावेश आहे. सहा वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या भावाने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा ती इयत्ता पाचवीत होती. त्यानंतर तो सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. ही बाब एकदा तिच्या दुसऱ्या भावानेही पहिली. मात्र त्याला विरोध करण्याचे सोडून त्यानेही तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे या मुलीची मानसिक आणि शारीरिक प्रकृती ढासळत गेली. अखेर कंटाळून तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. आईने लगेच मालवणी पोलिसात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)